About Kapsan

थोडेसे कॅपसन इन्स्टिट्यूट विषयी..

नमस्कार...

आपणांस कल्पना असेलच की, इ. १० वी नंतर सायन्सकडे, विशेषतः इंजिनियरिंग व मेडिकल क्षेत्रात करियर करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना देश पातळीवर घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे लागते.

देशपातळीवरील स्पर्धेचा विचार करता सदर परीक्षांचे सर्वोत्तम कोचिंग राजस्थान कोटा येथे दिले जाते. राजस्थान मधील कोटा हे शहर IIT-JEE व NEET या इंजिनियरिंग व मेडिकल प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी भारतात अग्रगण्य मानले जाते. दरवर्षी लाखो विद्यार्थी तेथे जावून सदर स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. आपल्या कोकणात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची इ. १० वी नंतर ११ वी व १२ वी सायन्स सोबतच IIT-JEE / MHT-CET तसेच NEET सारख्या स्पर्धात्मक परीक्षांची तयारी होणे गरजेचे असते, ज्यासाठी विद्यार्थी कोकणातून बाहेर पुणे, मुंबई इ. ठिकाणी जातात. याच कोटा शिक्षण प्रणालीचा फायदा आपल्या कोकणातील विद्यार्थ्यांना व्हावा ह्या हेतूने कॅपसन इन्स्टिट्युट कोटा, रत्नागिरी शाखा २०१८ पासून रत्नागिरीत यशस्वीपणे कार्यरत आहे.

अत्यंत अचूक व प्रभावी शिक्षण पध्दती, विद्यार्थ्यांवर दिले जाणारे वैयक्तिक लक्ष आणि सोबतच आलेले रत्नागिरीतील सर्वोत्तम निकाल याच सह इतर वैशिष्ट्यांमुळे अल्पावधीतच कॅपसन इन्स्टिट्युट आपल्या कोकणातील पालकांच्या विश्वासास पात्र ठरली आहे. वय वर्ष १५ ते १६ असणाऱ्या आपल्या पाल्यास त्याच्या घरापासून शेकडो कि.मी. दूर असणाऱ्या शहरांमध्ये ज्या शिक्षणासाठी आपण पाठवतो, तसेच किंवा त्याहूनही सरस असे शिक्षण कॅपसन इन्स्टिट्युट ने आपल्या जवळ रत्नागिरीतच उपलब्ध केले आहे. दरवर्षी सातत्याने आलेले उत्तम निकाल हे त्याचेच द्योतक आहे.

प्रत्येक पाल्य हा त्याच्या पालकांसाठी अनमोल आहे व त्याच्या पुढील करीयरची दिशा ठरवण्यासाठी आपण तितकेच सजग असणे गरजेचे आहे. आज रत्नागिरीत आम्ही कॅपसन इन्स्टिट्युटने उपलब्ध केलेल्या शैक्षणिक सोयी आपण पालक म्हणून समक्ष भेट देऊन जाणून घेतल्यास, आपल्याला त्याचा फायदाच होईल. आपल्या पाल्यास त्याच्या पुढील करीयरच्या वाटचालीस भरपूर शुभेच्छा..!! धन्यवाद ..!!

टीम कॅपसन...

A focused classroom scene with students attentively solving science problems under a teacher’s guidance.
A focused classroom scene with students attentively solving science problems under a teacher’s guidance.

150+

15,000

Trusted by thousands

Top results

Our Location

Situated in the heart of the city, Kapsan Institute offers a focused environment for science and competitive exam prep.

Address

2nd Floor, M.N.Joshi English Medium School, Near Phatak High School, Ratnagiri

Hours

9 AM - 6 PM

gray computer monitor

Contact Us

Reach out for personalized guidance and support.